जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | केंद्र शासनाने कडधान्य संदर्भात आकस्मिक साठा मर्यादे बाबत अधिसूचना जारी केली आहे. या धोरणाला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. यामुळे सोमवारी बाजार समितीतील व्यवहार बंद राहणार आहेत. जळगाव मार्केट यार्ड असोसिएशनने याबाबत बाजार समितीला पत्र दिले आहे. पाच जुलै रोजी व्यापारी व्यवहार बंद ठेवणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी माल आणू नये असे सांगण्यात आले आहे.