राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना दुसरीकडे लोकसभा सचिवालयानं कार्यालयांचं वाटप करताना पक्षांच्या नावाचा जो उल्लेख केल्या, त्यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या लोकसभा सचिवालयाकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एनसीपी असा उल्लेख करण्यात आला आहे. तर शिंदेंच्या पक्षाचं शिवसेना शिंदे असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राने अभूतपूर्व सत्ता संघर्ष पाहिला.या सत्ता संघर्षाची सुरुवात राज्यातील सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेपासून (Shiv Sena) झाली. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी ती पुन्हा पहायला मिळाली त्यानंतर दुसरा अंक रंगला तो शरद पवारांच्या (Sharad Pawar) अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदेंच्या शिवसेनेशी हात मिळवणी केली.
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कधीकाळी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेला शिवसेना हा मूळ पक्ष आणि अजित पवारांकडे कधीकाळी शरद पवार अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्धव ठाकरेंकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शरद पवारांकडे आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण राजकीय पक्षांच्या नावाचा वाद पाहिला आहे. आता लोकसभा सचिवालयाकडून करण्यात आलेल्या पक्षाच्या उल्लेखावरून राजकीय वर्तुळात असताना उधान आला आहे.