राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने रणशिंग फुकले असून महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुती 100 जागांवर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी एक-दोन महिन्यामध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती, आघाड्यांमध्ये जागावाटपांच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.महाविकास आघाडीतील घटक पक्षात 125 जागांवर सहमतीची बातमी येऊन ठेपत नाही तोच, महायुतीत सुद्धा 100 जागांचा फॉर्म्युला ठरल्याचे समोर आले आहे.
विधानसभा निवडणुकीची तयारी महायुतीने सुरू केली आहे. महायुतीतले तिनही प्रमुख पक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी प्रचारालाही सुरूवात केली आहे. अनेक ठिकाणी सभा मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. तर राष्ट्रवादीने जनसन्मान यात्राही सुरू केली आहे. आता या विधानसभेत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.