राजमुद्रा : शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत. या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने केली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. याबाबत 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता सुप्रीम कोर्टात 21 ऑक्टोबरला सुनावणी पार पडणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले नसले तरी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यापूर्वी शिवसेना पक्ष आणि चिन्हबाबतची सुनावणी दोन आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. ही सुनावणी आज होणार असल्याचे समोर आले होते. पण आता सुनावणी लांबणीवर पडली आहे. या याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आणि ठाकरें गटाने जोरदार कंबर कसली असून आता पक्षाच्या बाबतची सुनावणी लांबणीवर पडल्याने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अजून वाट बघावी लागणार आहे.