राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना पुण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे.अनेक वर्षांच राजकीय वैर बाजूला ठेवून अजित पवार (Ajit Pawar) आणि सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) आज एकत्र येणार असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा झाली आहे.
माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पुण्यात पुणे फेस्टिवलची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून अजित पवार आजपर्यंत या कार्यक्रमात गेले नव्हते. त्यामुळे यंदा पुणे फेस्टिवलचे उद्घाटन त्यांच्या हाताने होणार असल्याने सुरेश कलमाडी आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आला आहे.
पुणे फेस्टिव्हल’ची 36व्या पुणे फेस्टीव्हलचे उद्घाटन आज 4:30 वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे सुरू होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार छत्रपती शाहू महाराज यांचीही उपस्थिती राहणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात 15 वर्षं एकत्र सत्ता असतानाही पुण्यात अजितदादा आणि सुरेश कलमाडी यांच्यात कट्टर वैर होते. मात्र आता या पुणे फेस्टिवलच्या निमित्ताने ते पुन्हा एका मंचावर दिसणार आहेत.