राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महायुतीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जागावाटपावरून 3-4 बैठका झाल्या आहेत.आता या निवडणुकीसाठी महायुतीची 100 जागांची यादी तयार असल्याची माहिती समोर आली आहे.. ज्यात, भाजपचे 50 उमेदवार, शिंदेंच्या शिवसेनेचे 25 उमेदवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 25 उमेदवारांचा समावेश आहे.
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य 25 उमेदवार ठरले असून बारामतीतून अजित दादाच लढणार असल्याची माहिती आहे.या विधानसभेसाठी बारामतीतून अजित पवार, येवल्यातून छगन भुजबळ, आंबेगावातून दिलीप वळसे पाटील, परळी धनंजय मुंडे, कागलमधून हसन मुश्रीफ, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, रायगडमधून पुन्हा एकदा अदिती तटकरे, अहमदनगमधून संग्राम जगताप, खेडमधून दिलीप मोहिते पाटील संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहेत. अहेरीतून धर्मराव बाबा आत्राम, कळवणमधून नितीन पवार, इंदापूरमधून दत्ता मामा भरणे, उदगीर- संजय बनसोडे, पुसद इंद्रनील नाईक, वाईतून मकरंद आबा पाटील, पिंपरीतून अण्णा बनसोडे, मावळमधून सुनिल शेळके, अमळनेरमधून अनिल पाटील, जुन्नरमधून अतुल बेनके, वडगाव शेरीतून सुनिल टिंगरे हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आहेत.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून महायुतीच्या नेत्यांनीही उमेदवार निश्चित केला असल्याची माहिती समोर आले आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.