राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला अहेरी मतदारसंघ आता चांगला चर्चेत आला आहे. या मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून मोर्चे बांधलेल्या सुरुवात झाली असून पहिल्यांदाच बाप -लेकीत विधानसभेची चुरस रंगणार आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम विरुद्ध आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यात राजकीय लढत होणार आहे. तर माजी आमदार अंबरीश आत्राम हे महायुतीत तिकीट मिळालं नाही, तर बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत, अशी माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी बंड करत शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहेरीत आली तेव्हा त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा झाला. आता यावर धर्मरावबाबा आत्राम यांचे पुतणे अंबरीश आत्राम यांनी निशाणा साधला. हा सगळा बाप -लेकिन चा खेळ आहे. कोणीही निवडून आले तरी आमदारकी घरातच राहणार आहे, असा टोला त्यांनी लगावला.
या विधानसभा निवडणुकीसाठी जर मला महायुतीकडून तिकट मिळाले नाही, तर मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढेन. अपक्ष म्हणून ही निवडणूक लढण्यास मी तयार आहे”, असे अंबरीश आत्राम यांनी म्हटले आहे. तसेच मी भाजप पक्ष सोडला तरीही भाजप पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबतच असणार आहेत. त्यामुळे मी या विभागातून निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच असा निर्धार त्यांनी केला. त्यामुळे अहिर मतदारसंघात बाप – लेक -पुतण्या असा सामना रंगणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.