.
राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुती (Mahayuti ) आणि महाविकास आघाडीकडून ( MVA)जागावाटप आणि मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्मुला ठरला असून काँग्रेसने 105 – 135 जागावर तर ठाकरे गटाने 95 -100 जागावर, तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 80 – 90 जागांसाठी आग्रह असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील 36 पैकी 22 जागावर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे तर मुंबईतील 36 पैकी 18 जागांवर काँग्रेसचा दावा आहे. तर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा 7 जागांसाठी आग्रह आहे. आता या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी किती जागा पदरात पाडून घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या विधानसभेत महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,शरद पवार गट मुंबईतील अंधेरी वेस्ट, वर्सोवा, कुर्ला, अणुशक्ति नगर, दहिसर, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांची मागणी करत आहे. या निवडणुकीसाठी या जागा पदरी पडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.