राजमुद्रा : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari )यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला, असा खुलासा त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत बोलताना ते म्हटले की, मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे तसेच मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही… माझ्या पक्षाने मला सगळं काही दिलं आहे. त्यामुळे पंतप्रधान म्हणून माझे ध्येय कधीच नव्हतं… ज्याबद्दल मी माझ्या स्वप्नातही विचार केला नव्हता. त्यामुळे असा कोणत्याच प्रस्तावाला मी बळी पडत नाही. मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही. मी माझ्या विचारधारेवर चालत राहील, असं म्हणत गडकरींनी राजकारणातील आणि पत्रकारितेतील नैतिकतेच्या मुद्द्यावर जोर दिला.
यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आज जे सरकारमध्ये बसून या देशातील मुल्यांशी तडजोड करत आहेत, यात लोकशाही, स्वातंत्र्य न्याय व्यवस्था, पालिका तो एक अपराध आहे असं मी मानतो. नितीन गडकरी हे सातत्याने त्याबद्दल बोलत राहिले, त्यांनी याविरुद्ध आवाज उठवला, त्यांच्या भूमिका मांडल्या. कोणी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांना जर हा सल्ला कोणी दिला असेल, मला यात काहीही चुकीचं वाटत नाही, असे ते म्हणाले.