राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. अशातच आता महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. यामध्ये भाजपला (Bjp )सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. भाजपला या निवडणुकीत 125 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढायची आहे, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde )यांच्या शिवसेनेला देखील 100 जागांवर निवडणूक लढायची चर्चा आहे. आता अजित पवार गटाने(Ajit pawar group )ही 80 ते 90 जागा मागितले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार गट विधानसभेसाठी 80 ते 90 जागा मागत असल्याचा खुलासा केला आहे. याबाबत ते म्हणाले, आमचे जे कारभारी आहेत, अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे चर्चा करत असतात. मी त्या चर्चेत जास्त लक्ष घालत नाही. त्यांनी मला काही सांगितलं नाही. त्यांनी मला वाटतं 80 ते 90 जागा मागितल्या होत्या. त्यावर किती निकालात आहेत याची मला कल्पना नाही”, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगणार असून जागावाटपावरून दोन्ही मधील पक्षात किती जागा पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागावाटपासाठी बैठका पार पडत आहेत. महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागावाटपासाठी सातत्याने बैठका पार पडताना दिसत आहेत.