राजमुद्रा : गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरात सध्या मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवरच आता शहरातील चोरांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेश्वर रेडी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. या आदेशानंतर त्यांनी पथक तयार करून चोरी करणाऱ्या संशयितास ताब्यात घेतली.
शहरातील टॉवरची बॅटरी चोरी करणाऱ्या संशयीतास त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याच्यासोबत साथीदार असल्याची माहिती दिली. संशयित भिकन युवराज पाटील याने आपल्या सोबत धर्मेंद्र फकीरा पाटील, अक्रम अली कमर अली असे साथीदार असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडून मोबाईल टॉवरचे एकूण बारा बॅटऱ्या काढून दिल्या. तसेच त्यांनी मारवड व अमळनेर शिवरात असलेल्या जिओ मोबाईलच्या बॅटऱ्या चोरी केली असल्याचे कबूल केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोगो संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, गोरख बागुल नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, राहुल बेसाने,विलास गायकवाड, भारत पाटील अशांचे पथक तयार करण्यात आले. त्याने तपासात या सर्वांचा शोध लावला.
सदरची कारवाई महेश्वर रेडी पोलीस अधीक्षक, श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.