राजमुद्रा : विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सूरू आहे.अशातच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. देवेंद्र फडणवीस आमच्या मनातील मुख्यमंत्र्या असल्याचे वक्तव्य त्यांनी केल आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेपणाने सुरू असून महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरुन सस्पेन्स टिकवून ठेवले आहे. पण महायुतीत मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेंच सुरूच आहे. अजित दादा हेच राज्याचे मुख्य म्हणून बॅनर झळकले. तर एकनाथ शिंदे हेच महायुतीचा चेहरा असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच आता गिरीश महाजन यांनी त्यांच्या मनातील CM देवेंद्र फडणवीसच असल्याचे जाहीर करुन टाकले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुती कुणाच्या चेहऱ्यावर मत मागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मुख्यमंत्री कोण असणार याबाबत चर्चा सुरू असताना मंत्री महाजन यांनी आपल्या सगळ्याला कल्पना आहे आमच्याकडे चेहरा एकच आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, भाजपाचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीत होतील. पण आमच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.