राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीआधीचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal )यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घोषित केला. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी कोणाशी वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोचली असतानाच आता अरविंद केजरीवाल यांनी मनाचा मोठेपणा दाखवत, आपल्या पक्षातील महिला नेत्या आणि मंत्रिमंडळातील सहकारी आतिशी (Atishi) यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्लीच्या सभागृहात ठेवला आहे. मंत्री आतिशी ह्याच दिल्लीच्या मुख्यमंत्री (Chief Minister) होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे, शीला दीक्षित यांच्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहेत.
आगामी विधानसभेच्या तोंडावर दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मंत्री अतिशी ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार असल्याचे आता स्पष्ट झाला आहे.याआधी दहा वर्षांपूर्वी काँग्रेसच्या तत्कालीन नेत्या शिला दीक्षित ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत्या. अण्णा आंदोलनानंतर दिल्लीत मोठा राजकीय बदल झाला, आणि दिल्लीचे सुत्रे नव्याने स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाच्याहाती गेली. त्यानंतर, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर आता मंत्री अतिशी यांना संधी मिळणार आहे.
अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करत ईडीने त्यांना अटक केली होती. त्यानंतर, जामीनावर बाहेर येताच अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर, आता दिल्ली मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री असलेल्या आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा पदभार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तसा प्रस्तावही सादर केला आहे. त्यानुसार, 26 आणि 27 सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच अधिवेशन होणार आहे. 2 दिवसांच्या या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार असल्याची माहिती आहे.