राजमुद्रा : आगामी विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत(Sanjay Raut )यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde,)यांना चांगलाच टोला लगावला आहे. महायुतीबद्दल आम्हाला चर्चा करायची गरज नाही… भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे बाकीचे दोन उरलेले पक्ष हे आश्रित आहे. जेव्हा आश्रित असतात तेव्हा त्यांना आवाजत नाही. भाजपबरोबर स्वाभिमानाने लढलेली फक्त शिवसेना… उद्धव ठाकरेंना जी जमलं ते तुम्हाला जमेल का? अशी हिम्मत दुसऱ्या कोणामध्ये नाही असा टोला राऊतानी मुख्यमंत्र्यांना लगावला.
मोदी -शाहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता तर एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि चिन्ह कायद्याने मिळालं नसतं, असही राऊतांनी म्हटलं आहे.स्वाभिमान अस्मिता हे विषय मुळात त्यांच्यासाठी संपलेले आहेत. जे काय मिळते ते गप्प पणे घ्या ही भारतीय पक्षाची भूमिका राहील. स्ट्राईक रेट काय असतो हा स्ट्राइक रेट भाजप आणि मोदी शाहांमुळे झाला असा हल्लाबोल संजय राऊतांनी चढवला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटप संदर्भात उद्यापासून आमची चर्चा सुरू होईल. 18 ,19, आणि 20 या तारखेला आम्ही तिन्ही पक्षातील लोक एकत्र बसणार आहोत आणि त्यातून जो फॉर्मुला येईल कोणी कुठून लढायचे तो अंतिम राहील. जिंकेल त्याची जागा हीच पक्षाची मागणी आहे, असं संजय राऊत म्हणाले.