जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शासनाने लॉकडाऊनचे कठोर निर्बंध लादले असताना अनेकजण या निर्बंधांची पायपल्ली करताना दिसून येत आहे. पोलीस तसेच प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असताना नागरिकांचे सहकार्य मात्र मिळत नसल्याने जिल्हा यंत्रणे ला नियमाचे पालन न करणारे डोविक्री व खरेदी करणाऱ्यांमुळे केदुखी ठरत आहे. कोरोनाचा विस्फोट होत असल्याने अनेक रुग्ण उपचार घेत असताना दगावत आहे काही प्रमाणात कोरोनाची रुग्ण संख्या कमी येत असली तरी देखील तिसऱ्या लाटेचे संकेत वैद्यकीय तज्ञानी दिले आहे, तिसरी लाट यापेक्षा भयंकर असून प्रशासकीय पातळीवर विशेष उपाय योजना करण्याचे युद्ध पातळीवर चालेले आहे. काही जण माक्स चा उपयोग न करता खुलेआम पणे संचार करीत आहे अत्यावश्यक सेवेतील विक्रेत्यांना ७ ते ११ अशी वेळ दिली असताना दिवसभर आपला व्यवसाय कसा करिता येईल म्हणून नियम न पाळता विक्री करीत आहे. नागरिक देखील भाजीपाला घेताना मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असून यामुळे कोरोनाचा फैलाव होत आहे, यंत्रणेला सहकार्य न करणारे च कोरोनाला आमंत्रण देत आहे.
कडक निर्बंधाची पायमल्ली
भाजीपाला अत्यावश्यक विक्री मध्ये नोंदवण्यात आला असला तरी काही विक्रेते नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. ७ ते ११ यावेळेत व्यवसाय करण्यास परवानगी असताना काही विक्रेते दिवसभर आपला व्यवसाय सुरु ठेऊन आहे, अतिक्रमण विभागाची गाडी आल्यास तात्पुरता दहा मिनटे व्यवसाय बंद ठेवण्यात येतो मात्र पुन्हा विक्रेते ” जैसी थे “परिस्थिती निर्माण करीत असतात भाजीपाला खरेदी करीता येणारे नागरिक देखील संचारबंदी असताना बाहेर पडत भाजीपाला खरेदी करीत आहे. यामुळे दुपारी ११ वाजे नंतर देखील भाजीपाला विक्री अथवा खरेदी करणारे कोरोना वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे.
लसीकरणाचे नियोजन करावे
लसीकरणासाठी प्रशासनाचे नियोजन हि गंभीर समस्या होऊ पाहत आहे, लसीकरणासाठी टाकलेली ऑनलाईन अट फरफट करायला लावणारी आहे. यासाठी जिल्हा प्रशासनची यंत्रणा देखील कमकुवत ठरत आहे. नागरिक लसीकरण केंद्रांवर गर्दी असून कोरोनाचे कुठलेही नियम पाळताना दिसून येत नाही सर्वत्र लसीकरण केंद्रांवर गर्दीचे प्रमाण अधिक असल्याने कोरोना फैलावाचे केंद्र लसीकरण केंद्र बनले आहे. आपला जीवितास धोका असताना शासनाचे कडक निर्बंध वेशीला टांगले जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच देखल घेऊन नियोजन करण्याची गरज असून अन्यथा आणखी मोठे सक्त उभे राहण्याची शक्यता आहे.