राजमुद्रा : राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना केंद्रात विरोधी पक्षाची भूमिका वठवणारे तीन राज्यातील मुख्यमंत्री ‘राजीनामाअस्त्र’ वापरण्याची भाषा करत आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा आणि आता पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जीसुद्धा राजीनामा देण्याची तयारी दर्शवत आहेत. हे तिन्ही नेते आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राजीनाम्याचे हत्यार वापरत आहेत. परंतु या राजकीय हत्याराचा त्यांना फायदा होणार की तोटा? हे पाहणे गरजेचे आहे.
याआधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन पाच महिने कारागृहात राहिले. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसुद्धा सहा महिने कारागृहात राहिले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला. त्यावेळी सीबीआय पिंजऱ्यातील पोपट नाही, हे सिद्ध करण्याची गरज असल्याचा फटकार सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला लगावला. आता काही महिन्यांत म्हणजे 2025 च्या सुरुवातीला दिल्ली विधानसभेची निवडणूक आहे.. अशातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. कोलकोता अत्याचार आणि हत्या प्रकरणावरुन राज्यातील डॉक्टर संपावर आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी ममता बॅनर्जी यांना वाट पाहावी लागत आहेत. डॉक्टर आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. डॉक्टरांना समजण्यात अपयश आल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
राज्याचे तीन मुख्यमंत्री अडचणीत आले आहेत. परंतु या राजीनामा अस्त्राच्या अडचणीचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता याचा राजकीय लाभ त्यांच्या पक्षाला होणार की विरोधी पक्षाला होणार? हे जनतेच्या न्यायालयात ठरणार आहे.