राजमुद्रा ; राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रसीखेच सुरु झाली आहे . यातच आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे . त्यांनी देवेंद्र फडणवीस आमच्या मनातील मुख्यमंत्री, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनाही यावर प्रतिक्रिया दिली आहे . ते म्हणाले , मला वाटतं एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, मात्र मुख्यमंत्री कोण होणार? हे सर्व वरिष्ठ नेते ठरवतील, असेही शिरसाट म्हणाले . मात्र विधानसभेनंतर मुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते .. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांच्या मनात फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला हवेत असं वाटतं, पडळकर यांच्या मनात अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत तर माझ्या मनात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असे वाटत. मात्र अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे म्हटले आहे . आता या मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच रंगणार आहे . दरम्यान आगामी निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या दोन दिवसानंतर बैठका सुरू होणार आहेत. तिन्ही नेते बैठक घेऊन कोण किती जागा लढव्याच्या ते ठरवतील. काही नावाची लवकरच घोषणाही करणार आहेत. मजबुतीने सरकार आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू झाली असून महायुतीचा घटक पक्ष असलेला अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच तयारीला लागला आहे.