राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जोमाने मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटात बाहेरील पक्षाच्या नेत्यांची इनकमिंग व्हायला सुरुवात झाली आहे. अशातच आता अजित पवार गटाला (Ajit pawar )शरद पवारांनी(Sharad Pawar )धक्का दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश समन्वयक आणि प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे, ईश्वर बाळबुद्धे यांची घरवापसी होणार आहे. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांना धक्का बसणार आहे.
छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांचा उद्या शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश पार पाडणार आहे. ओबीसींना न्याय मिळत नसल्याची भावना घेऊन ओबीसी पदाधिकारी नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र नियुक्तीचा आदेश सरकार अस्तित्वात असेपर्यंत निघालेला नव्हता. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. तेव्हा ईश्वर बाळबुधे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता वर्षभराच्या आत त्यांची पुन्हा घरवापसी होणार आहे.
आगामी विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेला अजित पवार गट ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असला तरी राष्ट्रवादीचे काही आमदार शरद पवार गटात प्रवेश करत आहेत.त्यामुळे विधानसभेत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.