राजमुद्रा : आगामी विधानसभेच्या तोंडावर ठाकरें गटाच्या लोकसभेत निवडून आलेल्या खासदाराच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या खासदारकीला हायकोर्टात (High Court) आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का बसणार आहे.
निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं संजय दिना पाटील यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून करण्यात आली आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले शहाजी थोरात यांनी संजय दिना-पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. याप्रकरणी मिहीर कोटेंचा यांच्यासह अन्य उमेदवारांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का बसणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले होते.. मुंबईतील (Mumbai Election) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल किर्तीकर (Amol Gajanan Kirtikar), तर शिंदेंकडून रवींद्र वायकर (Ravindra Waikar) अशी लढत होती, अगदी चुरशीच्या निकालात शिंदेंनी मतदारसंघ बळकावला. या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. मात्र आता त्यांच्या खासदारांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर भाजपकडून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली होती. उद्धव ठाकरे गटाचे संजय दीना-पाटील यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा 29,800 मतांच्या फरकानं पराभव केला होता.