राजमुद्रा : राष्ट्रवादीत बंड करून महायुतीत सामील झालेल्या अजित पवार गटावर(Ajit Pawar Group )वारंवार शिंदे गट (Shinde Group )आणि भाजप (BJP)नेत्यांकडून टीका – वाद विवाद होत असतात.आता हाच वाद विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्ली दरबारी पोहोचला आहे. यामुळेच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार गटाचे नेते भाजप नेत्यांची थेट दिल्लीत तक्रार करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.
अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे नेते दिल्लीत जाऊन महायुतीतील काही नेत्यांची तक्रार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गट आणि भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे विरोधकांकडून सातत्याने महायुतीची बदनामी होत आहे. यामुळे नागरिकांकडूनही संताप होत आहे. याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळेच अजित पवार गट थेट दिल्ली हायकमांडकडे तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान दुसरीकडे महायुतीतील महामंडळाचा वाटप करण्यात आल्यानेही अजित पवार गटाला डावललं असल्याने अजित पवार गटात नाराजीचा सूर पसरला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. यामुळे सर्वच पक्ष मतदारसंघांची चाचपणी करत आहेत. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील वाद शिगेला पोहोचल्याची चिन्हे दिसत आहेत.