राजमुद्रा : आगामी विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत ची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीत भाजप (BJP) 160 जागा लढणार असल्याची माहिती आली आहे. आता शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला किती जागा मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आगामी विधानसभा निवडणुका या दहा ते वीस नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आले आहे.या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच आता भाजपकडून दोन दिवस मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 23, 24 तारखेला बैठक तर 2 ऑक्टोबरनंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत बाजी कोण मारणार हे पाणी महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजप आणि महायुतीला लोकसभा निवडणुकीत उमेदवार उशिरा जाहीर केल्याचा फटका बसला होता. त्यामुळे यंदा भाजप उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना आधी देणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपनं विद्यमान खासदार आणि उमेदवारांच्या मतांना तेवढं लक्षात घेतलं नव्हतं, यंदा मात्र ती काळजी जास्त घेतली जाण्याची शक्यता आहे. या आगामी निवडणुकीसाठी भाजप जोमाने तयारीला लागला आहे.
राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूकीची चर्चा सुरु आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूका लागतील असे देखील म्हटले जात आहे. राज्यामध्ये नवीन सरकार 28 नोव्हेंबर पूर्वी निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांचे सर्व टप्पे हे 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान घेतले जातील अशी माहिती समोर येत आहे.