राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीपूर्वीच दोन वर्षांपूर्वी झालेल्या फोडाफोडाच्या राजकारणाला ऊत आला आहे.. तसे पडसाद अजूनही अनेक विधानसभा मतदारसंघात दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.
मधुकरराव चव्हाण हे तुळजापूरमधील काँग्रेसचे नेते व माजी मंत्री आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी ते इच्छुक देखील आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यामध्ये मधुकरराव चव्हाण यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
लोकसभा निवडणुकी दरम्यान चव्हाण यांचे पुत्र आणि तुळजाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याच पार्श्वभूमीवर मधुकरराव चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर हा आरोप केला आहे.. दरम्यान आगामी विधानसभेसाठी त्यांनी जोरदार तयारी केली असून विधानसभेत ते आपले नशीब आजमावणार आहे. यासाठी आता एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहे.