जळगाव राजमुद्रा राष्ट्रवादी | काँग्रेस पक्षाच्या नेत्या कल्पना पाटील यांची महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या महिला तक्रार निवारण समितीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनानुसार माजी मंत्री फौजिया खान यांनी स्थापन केलेल्या समितीने हा निर्णय घेतला आहे. फौजिया खान यांनी नुकतेच कल्पना पाटील यांना यासंदर्भात नियुक्ती पत्र देऊन त्यांचे स्वागत केले आहे.