राजमुद्रा : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील 15 पैकी दहा जागांवर शरद पवार गटाने(Sharad Pawar Group )दावा ठोकला आहे. दरम्यान याआधी या मतदारसंघातील नावे निश्चित केली होती. शरद पवार गटाच्या दाव्याने महाविकास आघाडीत बिघाडी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार वसंत गिते आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची नावे निश्चित केली आहेत. मात्र, शरद पवार गटाने या दोन्ही जागांवर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे आता नाशिकमधील जागा महाविकास आघाडीत नेमक्या कुणाच्या वाट्याला जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार विधानसभेसाठी जोमाने मैदानात उतरले आहेत. दरम्यान नाशिक मधील दहा जागावरती ते लढणार यावर ठाम आहेत. त्यामुळे नाशिकची जागा महाविकास आघाडीत कोणाला सुटणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान महायुतीतही नाशिकच्या जागेवरून वाद सुरु असल्याचा दिसून येत आहे.शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) विधानसभा निवडणुकीत आपल्याबरोबर दिसतील असे विधान केले होते. यानंतर या मतदारसंघात भाजपने दावा केला असल्याने नाशिकच्या सर्व जागा आमच्या असल्याचा इशाराचं शिंदेंच्या शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे महायुतीतील ही जागा कोणाला सुटणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.