राजमुद्रा : राज्य व केंद्र शासनासह जळगाव महापालिकेतर्फे शहरात शून्य कचरा डेपोची संकल्पना अमलात आणण्यात येणार आहे. या संकल्पनेतून शहरातून संकलित होणाऱ्या कचऱ्यावर महापालिका प्रक्रिया करणार आहे.. त्यामुळे नागरिकांना आता कचरा देताना ओला व सुका अशा दोन पद्धतीने वेगवेगळ्या करून द्यावा लागणार आहे. घंटागाडी आल्यानंतर एकत्रित केलेला कचरा महापालिका स्वीकारणार नाही..
घंटागाडीत कचरा टाकण्याअगोदर नागरिकांना ओला व कोरडा कचरा दोनं वेगवेगळ्या पेट्यात अथवा डब्यात ठेवावा लागणार आहे.तसेच दोन महिन्यापूर्वीच महापालिकेने बारकोड असलेले स्टिकर दिलेले आहेत त्यावर लावावे लागणार आहेत. तसेच घंटागाडी चालकाकडील सहाय्यकाकडे बारकोड तपासणी यंत्र असेल त्याचा वापर करून तो कचरा पेटीवरील बारकोड स्कॅन करेल त्यानंतर तो ओला व कोरडा कचरा घंटागाडीत विलगीकरण करून टाकेल अशी माहिती शहर उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी दिली.
कचरा डेपोवर जमा झालेल्या ओल्या कचऱ्यावर कल्चर फवारून त्याचे खत तयार करण्यात येणार आहे तर विलगीकरण केलेल्या कोरड्या कचऱ्यातील धातु कागद,प्लास्टिक हे त्या कंपन्यांकडे पुनप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत.. तसेच प्लास्टिक प्लास्टिकच्या कारखान्यात पाठवले जाणार आहे तेथे त्याच दिवशी त्या कचऱ्याची विघटनासह प्रक्रिया होईल त्यामुळे शून्य कचरा ही संकल्पना कार्यान्वित होणार आहे.
दरम्यान शहरातील नागरिकांनी विलगीकरण केलेला कचराच आता घंटागाडी स्वीकारणार आहे. असा कचरा उघड्यावर कुठेही फेकला तर त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.त्यामुळे जळगावकरांना महापालिकेच्या या संकल्पनेस सहकार्य करावे लागणार आहे.