राजमुद्रा : अवैध गौण खनिज उत्खनणप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांना बजावण्यात आलेल्या 126 कोटींच्या दंडाच्या नोटिशेला महसूल विभागाने स्थगिती दिली आहे. ही दिलेली स्थगिती नियमबाह्य असून शासनाने कोणत्या राजकीय दबावात ही कारवाई टाळली हे अजूनही समजले नाही. याप्रकरणी शासनाने पलटी मारल्याचा आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
याप्रकरणी न्यायालयाने खडसेंना पैसे भरण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र अचानक त्यांनी स्थगिती देऊन शासनाने पलटी मारली आहे. एकीकडे शासन चांगलं काम करत असल्याचे सांगते आणि दुसरीकडे शासनाची फसवणूक करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सतेत सहभागी असलेले व मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत 43246 मतदारांची नावं दोन वेळा व काही जणांची तीन-तीन वेळा आल्यासही आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत मात्र कोणतीही त्यांच्याकडून कार्यवाही न झाल्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.