राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बारामतीत लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे ( Yugendra Pawar) फिक्स आमदार म्हणून बॅनर लागले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याचेही चर्चा सुरू झाल्या आहेत.सध्याच्या स्थितीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील अशी नावे चर्चेत आहेत. या सर्वांत जर कोणी शांत असतील तर ते नाव आहे शरद पवार यांचे. दरम्यान जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष झाला तर शरद पवार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदी देऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आल आहे.
बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत.