राजमुद्रा : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना पक्षातील नेत्यांचे इन्कमिंग आणि आउटगोइंग सुरू झाले आहे. अशातच आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar)यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले(Ramdas Aathvale )यांनी ऑफर दिली आहे. तुम्ही आमच्यासोबत या, तुम्हाला केंद्रात मंत्री करतो. तुम्हाला मंत्रिपद देण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो असे आठवले यांनी म्हटले आहे. आता . आठवले यांची ही ऑफर आंबेडकर स्वीकारतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते तर आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री बनू शकले असते.. अजूनही वेळ गेलेली नाही.. कारण एवढ्या निवडणुका लढवूनही प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला मान्यता मिळत नाही. त्यांचे उमेदवार निवडून येत नाही. त्यामुळे त्यांनी आता एनडीएत यावे. त्यांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी मी मदत करेल. नाही तर माझं मंत्रिपदही मी त्यांना द्यायला तयार आहे.असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान रिपब्लिकन पक्षाचं एकीकरण करण्यासाठी सगळ्या गटांनी एकत्रित येण्याची गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एकीकृत रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्ष व्हावं. माझा त्यांना पाठिंबा राहील. काहीही झालं तरी प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय ऐक्य शक्यच नाही, असंही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे .