राजमुद्रा : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीचा सामना राहणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जागावाटप आणि उमेदवारी यांची चर्चा सुरू आहे, अशातच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी निवडणुकीसाठी रणशिंगा फुगले असून विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला दहा ते बारा जागा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
येणाऱ्या एनडीए सरकार मध्ये आम्हाला मंत्रीपद द्यावे महामंडळ द्यावी अशी मागणी देखील रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच मागील लोकसभेला 2 जागा मागितल्या होत्या, मात्र मिळाल्या नाहीत. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला 12 जागा द्याव्यात. विदर्भात किमान 4 जागा द्याव्या. महाराष्ट्रात आम्ही 18 जागांची यादी केली आहे. त्यापैकी 12 जागा द्याव्या. आम्हाला भाजपच्या कोट्यातून मानू नये, तर भाजप, शिंदे आणि अजित दादा तिघांनी आम्हाला त्यांच्या कोट्यातून 4 – 4 जागा द्याव्या, म्हणजे आम्हाला 12 जागा मिळतील. असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी संभाचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना आमच्या सोबत या, मंत्रीपद देतो अशी ऑफर दिली आहे.. आता यावर ते काय निर्णय घेणार पाहणे महत्वाचे ठरणार आहे.