राजमुद्रा : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. या फुटीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar )जोमाने मैदानात उतरले. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात इनकमिंग करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. असंच आता विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी शरद पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. शरद पवार हे आमच दैवत आहे आणि ते साहेब आहेत. त्यामुळे ते कोणाला उभं करत आहेत, हे अम्हाला माहीत नाही. त्यासंदर्भात आम्ही काही बोलणार नाही, असं झिरवळ म्हणाले.
महायुतीचा घटक पक्ष असलेला अजित पवार गट आल्यापासून सिंदखेड आणि भाजपने त्यामध्ये नाराजीचा सुर उमटला आहे. यावरून महायुतीमध्ये सारखे खटके उडत असतात. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट अजित पवार गटाला महायुतीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. यावर झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांना महायुती मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात आमचे वरिष्ठ नेते बोलतील, असं झिरवळ म्हणाले आहेत.
दरम्यान आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने ही जलसमान यात्रेतून प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे.. या निवडणुकीत ही अजित पवार गट बाजी मारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट अजित पवार गटाला महायुतीतून बाहेर काढण्यास यशस्वी होणार का हे देखील पाणी महत्वाचे ठरणार आहे.