राजमुद्रा : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले असून चाळीसगांव शहरातील मुबशीर खान मेहमुद खान यांनी त्यांच्या राहत्या घरासमोरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोटरसायकल चोरून नेले बाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली होती.
यानंतर पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकलीचा व अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी गुनेश्वर पथकातील पोलिसांमालदार यांची पथक स्थापन करून त्यांना सूचना दन अज्ञात चोरट्यास शोधण्यास पथक रवाना केले. पथकतील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्यातील घटनास्थळी जावुन परीसरातील सी.सी.टि.व्ही. फुटेज चेक करुन मिळालेल्या फुटेजच्या आधारे व गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहीतीच्या आधारे आरोपीसह मोटारी ताब्यात घेतल्या.गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल व चोरी करतांना वापरलेली 70,000/- रुपये किंमतीची होन्डा HORNET कंपनीची काळ्या रंगाची मो. सा. असा एकुण 1,35,000/- रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई ही महेश्वर रेड्डी सो, पोलीस अधिक्षक जळगाव, कविता नेरकर (पवार), अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव, अभयसिंह देशमुख सो. सहा. पोलीस अधिक्षक चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, शसंदिप पाटील सो. यांचे सुचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोहेकों/1720 राहुल सोनवणे, पोना/2800 भुषण पाटील, पोना/3136 महेंद्र पाटील, पोकॉ/1419 विजय पाटील, पोकों/552 ज्ञानेश्वर पाटोळे, पोकों/208 आशुतोष सोनवणे, पोकों/ 2545 रविंद्र बच्छे, पोकों/3363 पवन पाटील, पोकों/2400 राकेश महाजन, पोकाॅ/78 नरेद्र चौधरी यांचे पथकाने केली आहे तसेच गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकाॅ- राहुल सोनवणे, पोकाॅ- ज्ञानेश्वर पाटोळे यांनी केली आहे.