राजमुद्रा ; राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना जळगावात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली असून या पार्शवभूमीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांचे बॅनर जळगावात झळकले आहे . त्यामुळे लवकरच विजय चौधरी यांची विधान परिषदेच्या आमदार पदासाठी देखील वर्णी लागू शकते अशी चर्चा होत आहे.
विजय चौधरी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय होते , ते नंदुरबार जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष होते , यामध्ये त्यांनी मोठया प्रमाणात ओबीसी समाजासाठी सामाजिक कार्य केलं . त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले.सध्या ते तैली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत . दरम्यान विधानपरिषदेच्या नियुक्तीसाठी या समाजाने मागणी केली आहे ..
दरम्यान या आधी भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केलेल्या व्यापक कार्याची दखल घेऊन केंद्रीय नेतृत्वाने संमती दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी देखील विजय चौधरी यांची निवड केली होती. दरम्यान वंचित तेली समाजासाठी तसेच त्यांच्या हक्कासाठी अहोरात्र झटणाऱ्या चौधरी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेत संधी मिळावी ही मागणी तेली समाजाने केली आहे. या अनुषंगाने लावण्यात आलेल्या जळगावतील बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महामंत्री लागल्यानंतर राज्यभरात विजय चौधरी यांनी लोकसभेच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात विजय चौधरी यांचे पक्ष वाढीसाठी अहोरात्र कार्य सुरू आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ देण्याचा काम विजय चौधरी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे नंदुरबार सारख्या आदिवासी भागात भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विजय चौधरी सातत्यपूर्ण प्रयत्न करताना दिसून येत आहे.
तेली समाजाकडून करण्यात आलेल्या बांधण्यानुसार भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून तेली समाजाकडून विजय चौधरी यांचे राज्यपाल नियुक्ती विधान परिषदेवर आमदारकीसाठी नियुक्ती व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. “अबकी बार विजय भाऊ आमदार .. , तेली समाजाला न्याय देण्याची हीच ती वेळ… असे आशयाचा मजकूर असलेले बॅनर सध्या जळगाव जिल्हावासियांचे लक्ष वेधून घेत आहे