राजमुद्रा : महाराष्ट्र शासन वर्षभर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक,वैचारिक जडणघडणीत अत्यंत मौल्यवान भुमिका बजावणार्या संत,महात्मा,समाजसेवक,स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रपुरुष यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी करुन त्यांचा कार्याला/स्मृतींना उजाळा देत असत. मात्र यात विठ्ठलांचे निस्सिम भक्त,वारकरी सप्रदायांचे संत शिरोमणी,सोनार समाजाचे आराध्य दैवत असलेले संत श्रेष्ठ श्री नरहरी सोनार यांचा समावेश नाही. त्यामुळे शासकीय पातळीवर त्यांची जयंती साजरी करावी या मागणीसाठी राज्याचे कॅबिनेट मध्ये अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले.
शासनाने आतापर्यत समाजातील अनेक महापुरुषांचा शासकीय स्तरावर जंयती साजरा करुन गौरव केला आहे.. तरी सन २०२५ ह्या शासकीय वर्षापासुन सोनार समाजाचे आराध्य दैवत संत नरहरी महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करुन त्यांचा कार्याचा गौरव शासनाने करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांना निवेदन देण्यात आले.