राजमुद्रा : विधानसभेच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मालेगाव मध्ये मोठा धक्का बसला आहे. 35 वर्षापासून ठाकरें गटाशी एकनिष्ठ असणारें माजी महानगर प्रमुख रामा मिस्तरी (Rama Mistry) यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena Shinde Group) प्रवेश केला आहे. मुंबई येथे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत रामा मिस्तरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात मुंबई येथे प्रवेश केला. श्रीकांत शिंदे यांनी भगवा ध्वज खांद्यावर देत रामा मिस्तरी यांचे स्वागत केले. रामा मिस्तरी हे निष्ठावान शिवसैनिकांपैकी एक होते. त्यांनी मालेगाव महानगर प्रमुख पद गेले कित्येक वर्ष सांभाळले होते.मात्र काही दिवसांपूर्वी रामा मिस्तरी यांनी ठाकरे गटाच्या पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. शिवसेनेतील फुटीनंतर मालेगावातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मिस्तरी हे मात्र ठाकरे गटातच राहिले. ठाकरे गटाने त्यांना तालुकाप्रमुख केले होते.त्यानंतर ठाकरे गटाने अचानक मिस्तरी यांच्याकडील पद काढून जितेंद्र देसले यांना दिले होते. यामुळे मिस्तरी आणि समर्थकांमधील नाराजी दिसून आली.. या नाराजी नंतर आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असून ठाकरे गटाला रामराम केला आहे.
रामा मिस्त्री हे 35 वर्षापासून ते शिवसेना (ठाकरे) पक्षात एकनिष्ठ होते. मात्र आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आदींच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. रामा मिस्तरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मालेगावात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.