राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी भर दिला आहे.नुकतेच काही भाजपाच्या माजी दोन नगरसेवकांनी वरिष्ठ पातळीवर भाजप नेत्यांची भेट घेतली असून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे .
जळगाव शहरात भाजपाचे सध्या विद्यमान आमदार राजू मामा भोळे हे आहेत , आमदार भोळे यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात खूप काही विकास कामे झालेली नाहीत अशीच दावे भाजपमधीलच काही नेते खाजगी चर्चा करताना सांगत आहे. ” पक्षाचा गड वाचवायचा असेल तर आम्हाला संधी द्यावी.. आम्ही देखील गेल्या 30 ते 35 वर्षापासून भाजपाचे काम करीत आहोत, तसेच विद्यमान आमदारांनी पाहिजे त्या प्रमाणात शहरात विकास कामे केली नसल्याने नाराजीचा सूर उमटत असल्याचें अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ , नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या डॉक्युमेंटरी पक्षश्रेष्ठी पुढे सादर करण्यात आल्याचे देखील बोलले जात आहे.
आमदार राजू मामा भोळे यांना दोन वेळा संधी मिळाली मात्र आम्हाला देखील आता संधी मिळावी असं साकड भाजप पक्षश्रेष्ठींपुढे इच्छुक उमेदवारांनी घातल असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाकडून इच्छुक असलेल्या एका उमेदवारांने देखील भाजपा पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे. जळगाव विधानसभेमध्ये इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याकारणाने ताकद मिळेल त्या पक्षाकडून अनेक जण आपल्या नशिब आजमावण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जळगाव विधानसभा लेवा बहुल मतदार संघ आहे. मात्र मराठा आंदोलनानंतर या ठिकाणी काही चित्र बदललेले आहेत काही उमेदवार मराठा, दलित , मुस्लिम अशी राजकीय गणिते देखील लावत आहे, काही उमेदवारांना भाजपाची उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडीकडे प्रयत्न करून पहावे का ? याबाबत देखील विचार विनिमय सुरू आहे. यासाठी अनेकजण वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहे.
भाजपा असो की महाविकास आघाडी या संपूर्ण घडामोडी मुंबई येथील हॉटेल ड्रॅगन मध्ये घडत असल्याचे विश्वासनीय सूत्रांच्या माध्यमातून समजते आहे. वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकांसाठी विशेष रूमची व्यवस्था देखील उमेदवाराच करीत आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वरिष्ठ नेत्यांनी आपले नाव उमेदवारीच्या यादीत घेण्यासाठी जोर लावावा यासाठी इच्छुक ताकद लावत आहे.
कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी प्रयत्न कमी पडायला नको, “अभी नही तो कभी नही” या भूमिकेतून यासाठी इच्छुक उमेदवार प्रयत्नशील आहे. राजकीय पक्ष देखील उमेदवारांची चाचपणी करताना आर्थिक रसद सर्वाधिक कोण पुरवू शकतो ? त्यासोबतच सामाजिक गणित याचा अंदाज घेऊन उमेदवाराचे उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.