राजमुद्रा : विधानसभेच्या तोंडावर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.या पार्श्वभूमीवर अलिबाग विधानसभेच्या (Alibaug Vidhansabha)उमेदवारीवरून शेतकरी कामगार पक्षात धुसफूस सुरू आहे. या निवडणुकीसाठी आमदार पंडीत पाटील (Pandit Patil) यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यांनी शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या अपरोक्ष पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केलीय. त्यांच्या या उमेदवारीवर जयंत पाटील काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शेकापचे माजी आमदार पंडित पाटील, तर शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, तसेच आस्वाद पाटील हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील हे अंतर्गत वादावर काय भुमिका घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.दरम्यान या विधानसभा उमेदवारीची माळ शेकापचे वरिष्ठ नेते कुणाच्या गळ्यात घालणार हा प्रश्न असताना पाटील कुटुंबात उमेदवारीच्या मुद्द्यावर धुसपूस सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार पडित पाटील यांनी जयंत पाटील हे स्वनिर्णय घेऊ शकत नाहीत, पक्षात अनेक ज्येष्ठ सक्षम आहेत असं म्हणत त्यांना टोला लगावला. रील्स स्टार आणि फेसबुक स्टार यांना राजकारण कितपत कळतं असं म्हणत जयंत पाटील यांच्या स्नुशा चित्रलेखा पाटील यांना सुद्धा पंडीत पाटील यांनी टोला लगावला. फेसबुक आणि रिल्सद्वारे आमदार होता येत नाही असंही ते म्हणाले. त्यामुळे त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. आता या निवडणुकीत काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.दरम्यान या अलिबाग मुरुड मतदारसंघाच्या उमेदवारीवरून पाटील घराण्यात नक्की कोणाला मिळणार उमेदवारी याची सध्या चर्चा सुरु आहे.