राजमुद्रा ; राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे . अशातच आता सर्वाधिक चर्चा आणि चुरस रंगणार आहे ती चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात . ग्रामीण भागातील सर्वाधिक मतदार असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडी सरशी करणार की महायुती आपला गड राखणार याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.अशातच या मतदारसंघात ठाकरे गटाचे उन्मेष पाटील आणि भाजपाचे मंगेश चव्हाण यांच्यात उमेदवारीवरून खटक्यावर खटके उडत आहेत . आता या मतदारसंघात उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरु असून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे उन्मेष पाटील आणि भाजपचे मंगेश चव्हाण यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे . उन्मेष पाटील यांच्या विरोधात भाजपा आमदार मंगेश चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीने मेसेज , कारस्थाने सोशल मीडियातून पसरवला जात असल्याचा खळबळजनक आरोप उन्मेष पाटील समर्थकाकडून केला जात आहे
सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ ,,, काय आहे पोस्ट ?
ये डर अच्छा लगा….उन्मेष पाटील नको…बाकी मग दूसरे उमेदवार चालतील… हे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांकडून पसरवले जात असलत्याचा खळबळजनक आरोप उन्मेष पाटील यांच्या समर्थकांकडून केला जात आहे . आता महाविकास आघाडीकडून नेमकं राष्ट्रवादीचे शरद पवार आणि उबाठा गटाचे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .या चाळीसगाव तालुक्यातील सोशल मिडीयाच्या माध्यमातुन उन्मेष पाटील कुणालाच होऊ शकत नाही , अशी नकारात्मकता पसरवून महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम चाळीसगाव भाजपा व मंगेश चव्हाण समर्थक करत आहेत. यावर उन्मेष पाटलांच्या समर्थकांनी पलटवार केला आहे .
अंधभक्तांनो तूम्ही म्हणतात की ,उन्मेषदादा पाटील कुणालाच होऊ शकत नाही.मग मंगेश चव्हाण कोणाला झाला रे. बाबाहो.हा मंगेश चव्हाण उन्मेष पाटलांच्या मागे मागे फिरणारा…यानेच मित्रत्वाचा घात केला ना!..यानेच 2019 ला उन्मेष पाटलांचे कार्यकर्ते व अगदी आँफीसमधून काम करणारे लोक आयते मिळवले ना . राजकारणात हलक्या कानाच्या भाऊंना नकारात्मक काल्पनिक गोष्टी सांगून तिकीट कापण्यासाठी प्रवृत्त केले ना.. महाराष्ट्रातील राजकारणात आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या विश्वासाला तडा देणारा एकनाथ शिंदे व चाळीसगाव तालुक्यातील राजकारणात आदरणीय उन्मेषदादा पाटील यांच्या विश्वासाला तडा देणारा मंगेश चव्हाण… हे संपूर्ण चाळीसगाव तालुक्यातील जनता जाणून आहे…त्यामुळे असले भंपक मेसेज पसरवून तूम्ही महाविकास आघाडीत संभ्रम मूळीच निर्माण करू शकणार नाहीत. असा आशयाचा मजकूर उन्मेश पाटील समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
या निवडणुकीच्या तोंडावर चाळीसगाव विधानसभा निवडणूक खूप चुरशीची ठरणार आहे. भाजपमधून ठाकरे गटात गेलेले माजी खासदार उन्मेष पाटील हे महायुतीसाठी आव्हान ठरतील अशी चर्चा आहे,,तर सध्याच्या घडीला भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनाच तिकीट मिळेल,अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे . याआधी पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला सोड चिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला होता. दरम्यान आगामी विधानसभेच्या रिंगणात उन्मेष पाटील कि मंगेश चव्हाण गड राखणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .