जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद करण्यात आलेली रेल्वेची सेवा आता पूर्वपदावर येत आहे. दरम्यान बहुतांश लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या आहेत, मात्र अजूनही पॅसेंजर गाड्या बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
त्या सुरू होत नसल्याने अप-डाऊन करणाऱ्या प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. त्यातच मासिक पास देणेही बंद आहे. त्यामुळे जळगाव, चाळीसगाव, नाशिक, भुसावळ येथून अप-डाऊन करणारे प्रवासी त्रस्त झाले असून, ही सुविधा सुरू करावी अशी मागणी होत आहे.