राजमुद्रा : लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच फटका बसल्यानंतर खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केल आहे. नुकताच त्यांनी विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दौरा केला यानंतर आता त्यांनी मुंबईसाठी विशेष प्लॅनिंग केल आहे. आगामी विधानसभेसाठी येत्या 1 किंवा 2 ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांनी विधानसभेसाठी खास रणनिती आखली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढील तीन दिवसात अखा मतदारसंघ पिंजून काढण्याचा निर्धारच केला आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे मुंबई भाजप अलर्ट मोडवर आले असून पुढच्या तीन दिवसात मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाणार आहे. हा रिपोर्ट अमित शाह यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे या विधानसभेसाठी भाजपाने मुंबईवर लक्ष केंद्रित केला आहे.
महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर ही निशाणा साधला आहे.निवडणुकीची रणनिती मांडताना आपल्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखायचे आहे, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच आपल्याला उद्धव ठाकरे, शरद पवारांचे राजकारण संपवायचे आहे, असेही त्यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवरच त्यांनी आता मुंबईला टार्गेट केल असल्याचे बोलले जात आहे.