राजमुद्रा : गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच फटका बसल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उपस्थितीत माहितीच्या तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक छत्रपती संभाजी नगरमध्ये पार पडली होती. मात्र त्याच छत्रपती संभाजी नगर मध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडणार असल्याचा दिसून येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.. त्यामुळे या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
छत्रपती संभाजी नगरच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे प्रशांत बंब हे आमदार आहेत. त्यांनी म्हटले की, सतीश चव्हाण मैदानात उतरणार हे मला माहिती होतं मात्र मला कोणाच्या विरुद्ध निवडणूक लढवायची नाही, त्यांनी मैदानात यावं असं आव्हान त्यांनी केला आहे.गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्रात एक वेगळा मतदारसंघ मी निर्माण केला आहे त्यामुळे मी विकासाच्या जीवावर निवडणूक लढणार आहे, असे प्रशांत बंब यांनी म्हटले आहे..
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, या मतदारसंघात मी गेल्या दोन अडीच वर्षापासून काम करतोय पण म्हणावं तसा विकास झालेला नाही. या मतदारसंघात लोकांना बदल अपेक्षित आहे.. त्यामुळे लढाव तर लागेल असं त्यांनी म्हटलं आहे.. दरम्यान विधानसभेच्या रिंगणात उतरल्यानंतर या गंगापूर विधानसभा मतदारसंघात बाजी कोण मारणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
याआधी गंगापूरमध्ये 2019 ची विधानसभा निवडणूक तिरंगी झाली होती. प्रशांत बंब हे त्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने पाटील आणि वंचितचे अंकुश कळवणे होते. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत दुरंगी लढत पाहायला मिळणार असल्याच दिसून येत आहे.