जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भुसावळ शहरातील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात कोरोना नियमांचे पालन करून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत ८ ते १२ जुलै दरम्यान वार्षिक ब्रह्मोत्सव होणार आहे. तर, सध्या भागवत कथा महोत्सव सुरू आहे. भाविकांनी घरूनच या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आव्हान राधेशाम लाहोटी, ब्रिजमोहन अग्रवाल, भवरलाल दरगड, जे बी कोटेचा यांनी केले आहे.