राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरून महायुती व महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे .या दोघांकडून कितीही दावे करण्यात येत असले तरी अजूनही जागावाटपावरून तिढा निर्माण होत आहे , अशी स्थिती असताना आता तिसरी आघाडी या विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.महाराष्ट्रात प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana) प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu), स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी निर्माण केलेली तिसरी आघाडी आता वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात उतरणार आहे , त्यामुळे महायुतीच टेन्शन वाढणार आहे . या तिसऱ्या आघाडीकडून नेमक्या किती जागा लढविल्या जातात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी विधानसभेसाठी तिसरी आघाडीकडून वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रात तिसऱ्या आघाडीकडून उमेदवार रिंगणात उतरविले जाणार आहे. महायुतीमध्ये असलेली इच्छुक उमेदवारांची गर्दी देखील आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न तिसऱ्या आघाडीकडून केला जाणार आहे. तर निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आर्वी विधानसभा क्षेत्रात आज मोठ्या संख्येने तिसऱ्या आघाडीतील प्रहारमध्ये पक्ष प्रवेश होणार आहेत. यात आर्वी विधानसभा मतदारसंघातील बीआरएसचे जय बेलखडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रहार जनशक्ती पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला जाणार आहे. त्यामुळे बीआरएसमधून प्रहारमध्ये जाण्याचा ओघ आता वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मतदारसंघात त्यांची ताकद वाढणार आहे .
दरम्यान या निवडणुकीसाठी वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रात तिसऱ्या आघाडीकडून उमेदवार रिंगणात उतरविले जाणार आहे. यासाठी मतदार संघात चाचपणी देखील केली जात आहे. आता तिसऱ्या आघाडीकडून वर्ध्यातील विधानसभा मतदारसंघातून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान महायुतीकडून ही या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे . आता या मतदारसंघात तिसरी आघाडी महायुतीला घेरण्याच्या तयारीत असल्याने महायुतीच टेन्शन वाढणार आहे . तसेच या मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .