राजमुद्रा : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठा फटका बसला.. या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुतीने विधानसभेसाठी मोठा प्लॅन तयार केला असून भाजप हायकमांड आता सतर्क झाल आहे. या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. अशातच आता मंत्री अमित शहा यांनी आगामी विधानसभेला महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजप आमदारांची झोप उडाली असून आता महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आणि महायुतीला फटका बसला.२७ पैकी केवळ ९ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले. या निकालाची पुनरावृत्ती विधानसभेत होता कामा नये यासाठी भाजप हायकमाड आता ठिकठिकाणी सभा घेत भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत आहे.
या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मंत्री अमित शहा यांनी एक किस्सा सांगितला, जेव्हा मी ३५ वर्षांचा होतो, तेव्हा विधानसभा निवडणुकीत पक्षाने माझे तिकीट कापले होते. त्यावेळी भाजपचे अध्यक्ष कुशालभाऊ ठाकरे माझ्याकडे आले होते. तेव्हा मी खूप दु:खी आहे असं त्यांना सांगितलं. तेव्हा तू अजिबात पक्षाचा प्रचार करू नकोस. दु:खी मनाने कोणताही माणूस चांगले काम करू शकत नाही”, असं ठाकरेंनी आपल्याला सांगितल्याचं शहा म्हणाले.दरम्यान, मंत्री अमित शहा यांच्या उदाहरणामुळे विधानसभेत महाराष्ट्रात (Maharashtra Assembly Elections 2024) देखील गुजरात पॅटर्न लागू होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.