जळगाव – नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरात मोठा उत्साह संचारला आहे अनेक उपक्रमांची जय्यत तयारी करण्यात येत आहे. आपल्या आराध्य आई भगवतीच्या आगमनासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. गरबा- दांडिया अशा विविध उपक्रमांचे आयोजन जळगाव शहरात देखील करण्यात आले आहे.
प्रथमच जळगाव शहरातील खानदेश सेंट्रल बिग बाजार परिसरामध्ये मुंबई चौपाटी साकारली जाणार आहे. यामध्ये विविध खाद्यपदार्थ, तसेच खानदेशी मेजवानी याचा आस्वाद घेता येणार आहे.
जळगाव शहरासह ग्रामीण भागातील व्यवसायिकांना नवरात्र निमित्त मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचे सेल्फी पॉईंट , लाईट डेकोरेशन अशा पद्धतीने मुंबई चौपाटी जळगाव शहरातील खानदेश सेंट्रल (बिग बाजार) मध्ये साकारली जात आहे.
त्यामुळे जळगावकरांना नवरात्रीच्या निमित्ताने साकारण्यात येणाऱ्या मुंबई चौपाटी मध्ये आनंद लुटता येणार आहे. या चौपाटीच्या माध्यमातून सामान्य खाद्य विक्रेता थेट जळगावकरांच्या संपर्कात येणार आहे. त्यामुळे मुंबई चौपाटी मध्ये स्टॉल लावणाऱ्या विक्रेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप संकल्पनेतून व्यवसायिक संधी उपलब्ध झाली आहे. स्किल फॉब्ज फाउंडेशन व युवा प्रगती ग्रुपच्या वतीने व्यवसाय धारकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.