राजमुद्रा : राष्ट्रवादीत बंड करून महायुतीत सामील झालेल्या अजित पवारांना ऐन विधानसभेच्या तोंडावर धक्यावर धक्के बसत आहे. कारण सलग पंधरा वर्षे एकहाती सत्ता राखलेल्या अजित पवारांचा बालेकिल्ला आता उद्ध्वस्त होऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भोसरी पाठोपाठ चिंचवड विधानसभेतही अजित पवारांना धक्का बसला आहे. चिंचवड विधानसभा लढण्याची तयारी केलेले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईरांनी (Bhausaheb Bhoir) अजितदादांच्या पक्षाला रामराम ठोकायचं ठरवलं आहे. त्यामुळे भाऊसाहेब भोईर तुतारी फुंकणार, मशाल पेटवणार की बंडखोरीचं हत्यार उपसणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
दरम्यान महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादीचा अजित पवार गट युतीत सामील झाल्यापासून भाजप आणि शिंदे गटांच्या नेत्यांच्यात नाराजीचा सूर पसरला आहे. त्यानंतर आता विधानसभेच्या तोंडावरशहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी दोन माजी महापौर आणि पंधरा माजी नगरसेवकांसह अजित दादांची साथ सोडत तुतारी फुंकली होती. तर दसऱ्याच्या दरम्यान माजी आमदार विलास लांडे, त्यांची पत्नी माजी महापौर मोहिनी लांडे आणि मुलगा विक्रांत लांडे ही तुतारी फुंकणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर आता आगामी विधानसभेच्या तोंडावर अजित दादांना एकामागोमाग एक बसणारे हे धक्के पाहता, त्यांचा बालेकिल्लाचं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी आज सायंकाळी त्यांच्या समर्थकांचा मेळावा आयोजित केलाय. या मेळाव्यात ते त्यांची पुढची दिशा जाहीर करणार आहेत.
ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर सुद्धा अजित दादांना आज रामराम ठोकणार आहेत. यासाठी संध्याकाळी होणाऱ्या समर्थकांच्या मेळाव्यात ते चिंचवड विधानसभा कोणत्या चिन्हावर की अपक्ष लढणार याची घोषणा करणार आहेत. त्यामुळे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..तसेच आजच्या मेळाव्यातून भाऊसाहेब भोईर तुतारी फुंकणार, मशाल पेटवणार की बंडखोरीचं हत्यार उपसणार? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.