राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारी मिळण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसली आहे. अशातच आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी “लिफाफा पॅटर्न “राबवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी भाजपकडून गोवा आणि बिहार विधानसभा निवडणुकीत राबविलेला ‘लिफाफा’ पॅटर्न राबविला जात आहे. वेगवेगळ्या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election 2024) कुणाला उमेदवारी द्यावी, याचा अंदाज घेण्यासाठी भाजपाने (BJP) मंगळवारी संभाजीनगरमधील पक्षातील जिल्हाभरातील प्रमुख 607 पदाधिकाऱ्यांकडून बंद लिफाफ्यात उमेदवारांची नावे मागवून घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य क्रमानुसार तीन उमेदवारांची नावे बंद पाकिटातून सोपविली आहे. त्यामुळे आमदारांना आता धडकी बसणार आहे.. त्यामुळे आता भाजपचा हा पॅटर्न महाराष्ट्रात कितपत प्रभावी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अनेक जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे
विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार का काय हे पाहणे गरजेचा आहे. मात्र तसे झाल्यास भाजप पक्षसंघटनेत याचे काय पडसाद उमटणार, हे बघावे लागेल.दरम्यान विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथी गृहावर भाजपची महत्त्वाची बैठक सुरू असून या बैठकीत भाजपने150 ते 160 जागांवर लढण्याचा चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.