राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना सत्ताधाऱ्यांकडून घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशानं पुरवणी अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केलेली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परळीतील सभेत बोलताना मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ता एकत्र मिळणार आहे… त्यांच्या खात्यात 3 हजार रुपये मिळणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा पुरवणी अर्थसंकल्प मांडला गेला त्यामध्ये केली होती. त्या योजनेनुसार जुलै महिन्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली होती. जुलै महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचे पैसे पाठवण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज दाखल केले होते त्यांना 31 ऑगस्टला तीन हजार रुपये देण्यात आले. सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना देखील 29 सप्टेंबरला पैसे देण्यात आले. आतापर्यंत तीन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित देणार असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान लाडक्या बहिणीसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत, भाऊबीजेची ओवाळणी म्हणून बहिणींच्या खात्यात जाणार आहे, हा शब्द तुम्हाला देतो. बहिणींनी काही काळजी करु नये, असं त्यांनी म्हंटल आहे. तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे. उद्या सुट्टी असेल, जे पैसे लागतील त्याची तरतूद करणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यामुळे दिवाळीत बहिणीसाठी सरकारकडून मोठी ओवळणी असणार आहे.दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते.