राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये इन्कमिंग आणि आउटगोइंग सुरू झाल आहे..यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार असून काही उमेदवाराकडून प्रचारही सुरू करण्यात आला आहे.. अशातच आता मुंबईतील वरळी मतदारसंघात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. “मी वरळीतून निवडणूक लढवणार आणि आदित्य ठाकरे यांना धूळ चारणार”, असा निर्धार सदावर्ते यांनी केला आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघात तगडी फाईट होणार असल्याच दिसून येत आहे.
वरळी मतदारसंघातून मी निवडणूक लढलो, तर 25 हजाराहून अधिक मताधिक्याने लीड घेईन. या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना धूळ चारण्यासाठी मला निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे आहे. माझी ही इच्छा मी पक्षश्रेष्ठींना कळवली आहे. मी ज्या विचारांच्या लोकांसाठी काम करत आहे, त्यांच्यापर्यंत मी माझ्या भावना पोहोचवल्या आहेत. आदित्य ठाकरे यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही”, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले आहे.. त्यामुळे वरळी मतदारसंघात शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे विरुद्ध वकील गुणरत्न सदावर्ते आमने सामने असणार आहेत..
वरळी विधानसभा मतदारसंघातून महायुती माझा नक्कीच विचार करेल..माझं केवळ एवढेच म्हणणं आहे की मी शरद पवारांना घाबरलो नाही, मी कधी ठाकरेंना घाबरलो नाही. त्यांना असं उडवून लावलं. वरळीतील जिजामाता नगरमध्ये असलेल्या 8000 झोपडीवासियांचा मी विकास करेन. त्यांना 600 स्क्वेअर फुटाचे घर देणार आणि एक मोठं रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी तयार करणार”, अशी मोठी घोषणा गुणरत्न सदावर्ते यांनी केली.