राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना आता कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण होते. पण ते गोमांस खात होते, असा दावा केला आहे.. इतकेच नाही तर त्यांनी गोमांस खाण्याचा प्रचार केल्याचा खळबळजनक दावा केल्याने वादाला तोंड फुटले आहे.
दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण असले तरी सार्वजनिक गोमांस खायचे. त्याचा प्रचार करायचे तसेच सावरकरांनी कधीच गोहत्येचा विरोध केला नाही. याबाबतीत त्यांचे विचार अत्यंत पुढारलेले होते, असे गुंडुराव म्हणाले. त्यांचे विचार कट्टर असले तरी दुसऱ्या बाजूने ते आधुनिक होते असे ते म्हणाले. तसेच त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद जिना यांचा उल्लेख केला. गांधी हे हिंदू सांस्कृतिक रुढीवादाचे मूर्तिमंत उदाहरण होते. पण ते कट्टर शाकाहारी होते. त्याचवेळी तो लोकशाहीवादी नेते असल्याचे गुंडुराव म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नवीन वादाची ठिणगी पडली आहे.
गांधीजी एक धार्मिक व्यक्ती होते. आता हा कट्टरतावाद फोफावत आहेत. गोरक्षकांच्या नावाखाली कुणाला पण मारहाण करण्यात येते. त्यांना सावरकरांचे विचार माहिती नाहीत. सावरकरांच्या कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी आजही गांधींजीचे विचार प्रेरक असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. तसेच दुसरीकडे भाजपा खासदार आणि वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौत यांनी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं केलेल्या सोशल मीडिया कमेंटमुळे नवा वादाला तोंड फुटले आहे. कंगना यांनी बुधवारी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल पोस्ट लिहिली होती. शास्त्रींना त्यांच्या 120 व्या जयंतीदिनी एका पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहताना त्यांनी महात्मा गांधींना कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत असल्याची टीका होत आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंआहे.