मुंबई राजमुद्रा वृतसेवा | पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली झाल्याचे समोर आले आहे. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की तसेच शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपली भूमिका सभागृहात मांडली त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात करण्यात आला राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी सभागृहात आमदारांची आबाजी मांडत भाजपच्या १२ आमदारावर झालेल्या कार्यवाहीचा निषेध केला आहे. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
महाविकास आघाडी सरकार कडून झालेल्या कार्यवाही मुळे भाजप राज्यात अधिक आक्रमक होताना दिसत आहे. तालिका सभापती जाधव यांच्या अंगावर आमदार धावून गेल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे.